भजने

Gurukunj    29-Apr-2023
Total Views |

सामुदायिक प्रार्थना

मंगलस्मरण (सवैया)

मंगल नाम तुम्हार प्रभू ! जो गावे मंगल होत सदा ।
अमंगलहारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिलको धोत सदा । ।
तुम आद-अनाद सुमंगल हो, अरु रुप तुम्हार निरामय है।
तुकड्या कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है ।।

प्रार्थनाष्टक

(हरिगीती का छंद) है प्रार्थना गुरुदेवसे, यह स्वर्गसम संसार हो । अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।। ना हम रहे अपने लिये, हमको सभीसे गर्ज है। गुरुदेव ! यह आशीष दे, जो सोचनेका फर्ज है|| १ ||

हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के। सच प्रेम के नीत नेम के सद्धर्म के सत्कर्म के ।।हो चीड झुठे राह की, अन्याय की, अभिमान की । सेवा करन को दास की, पर्वा नहीं हो जान की॥२॥
 
छोटे न हो हम बुद्धीसे, हो विश्वमय से ईशमय । हो राममय अरु कृष्णमय, जगदेवमय जगदीशमय ||हर इंद्रियोंपर ताब कर हम वीर हो अति धीर हो । उज्ज्वल रहे सरसे सदा, निजधर्मरत खंबीर हो|| ३ ||
 
यह डर सभी जाता रहे मन बुद्धी का इस देह का । निर्भय रहे हम कर्ममे, परदा खुलाकर स्नेह का ।।गाते रहे प्रभूनाम पर प्रभू तत्व पाने के लिये । हो ब्रह्मविद्या का उदय, यह जी तराने के लिये||४||
 
अति शुद्ध हो आचारसे, तन मन हमारा सर्वदा । अध्यात्म की शक्ती हमे पलभी नही कर दे जुदा ।।इस अमर आत्मा का हमें हर श्वासभरमें गम रहे। गर मौतभी हो आगयी, सुख दुःख हममें सम रहे||५||
 
गुरुदेव! तेरी अमर ज्योतिका हमें निजज्ञान हो । सत्ज्ञान ही तू है सदा, यह विश्वभरमें ध्यान हो ।।तुझ में नहीं है पंथभी, ना जात भी, ना देश भी । तू है निरामय एकरस, है व्याप्तभी अरु शेष भी|| ६ ||
 
गुण-धर्म दुनिया में बढे हर जीवसे कर्तव्य हो । गंभीर हो सबके हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो ।।यह दूर हो सब भावना, 'हम नीच है अस्पृश्य है' । हर जीव का हो शुद्ध मन, जब कर्म उनके स्पृश्य है||७||
 
हम भिन्न हो इस देह से, पर तत्व से सब एक हो । हो ज्ञान सबमें एकही, जिससे मनुज निःशंक हो ।।तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में।छोडे नही घरबार पर हो मस्त गुरु चरणारमें||८||
 
रचियता :- वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची निवडक भजने

तेरे नाम अनेक, तू एकही है।

(तर्ज मेरे दिल में गुरुने जादु किया...)

हर देशमें तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एकही है।

तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेलमें, मेलमें तूही तो है ।। टेक ॥। सागर से उठा बादल बनके, बादल से फटा जल हो करके । फिर नहर बना नदियाँ गहरी,

तेरे भिन्न प्रकार, तू एकही है ।। १॥

चीटीसेभी अणु-परमाणु बना, सब जीव जगत्‌का रूप लिया ।

कहीं पर्वत-वृक्ष विशाल बना,

सौंदर्य तेरा, तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया । तुकड्या कहे कोई न और दिखा,

बस! मैं और तू सब एकही है ।। ३॥

रचियता वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

राष्ट्रवंदना

तन-मन-धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा। सभी धर्म अरु पंथ पक्ष को, दिल से रहे पियारा।। विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा ||टेक // निर्भय हो यह देश की माता, मंगल किर्ती कराने । सत्य-शील अरु निर्मल मन से, वीरों को उपजाने // सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने । रंक- राव पंडीत भिकारी, सबको सुख दिलवाने ॥ विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा||१||

स्पृश्यास्पृश्य हटे यह सारा, देश-कलंक मिटाने / सबके मन कर्तव्यशिल हो, धन-उद्योग बढाने || सबका हो विश्वास प्रभू पर अपनी शक्ती बढ़ाने || ब्रह्मचर्य, अध्यात्म, दैविगुण घर घर में प्रगटाने । सारा भारत रहे सिपाही, शत्रू को दहशाने । तुकड्यादास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ती कराने || विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा||२||
रचियता वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

 

सबके लिये खुला है,

मंदीर यह हमारा ।

(तर्ज: ऊँचा मकान तेरा...)

सबके लिये खुला है, मंदीर यह हमारा । मतभेद को भूला है, मंदीर यह हमारा ॥ टेक ॥। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी । देशी विदेशियोंको, मंदीर यह हमारा||१||

मैदान पट बिछाया, डाला है एक आसन । सब देवता समाता, मंदीर यह हमारा||२||
संतोकी ऊँच बानी, पढते है मन्त्र जिसमें । सबका आवाज लेता, मंदीर यह हमारा||३||
मानवका धर्म क्या है, मिलती है राह जीसमें । चाहता भला सभीका, मंदीर यह हमारा||४||
है विश्वयोग इसका, विश्वात्म देव इसका । है शिस्त का रंगीला, मंदीर यह हमारा||५||
आओ सभी मिलेंगे, समुदाय प्रार्थना में । तुकड्या कहे अमर है, मंदीर यह हमारा|६||
रचियता वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

 

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव ।

(चाल आता तरी धाव..)

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव ।

देव अशानं, भेटायचा नाही हो ।

देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ||धृ० ॥

मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।

सोन्या-चांदीचा देव, त्याला चोराचं भेव ।

लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।

देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ॥ १ ॥

देवाचं देवत्व नाही दगडातं ।

देवाचं देवत्व नाही लाकडातं ।

सोन्या चांदीत नाही देवाची मात ।

देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ॥२॥

'भाव तिथं देव' ही संताची वाणी ?

आचारावाचून पाहिला का कोणी ?

शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।

देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ||३||

देवाचं देवत्व आहे ठायी ठायी ।

'मी - तू' गेल्याविण

अनुभव नाही ।

तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।

देव बाजारचा

भाजीपाला नाही हो ! ||४||

 

कशाला काशी जातो रे बाबा! कशाला पंढरी जातो

भजन

(चाल - काहेको तीरथ जाता रे भाई..)

कशाला काशी जातो रे बाबा! कशाला पंढरी जातो ! ||धृ० ॥

संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो । कीर्तनी मान डोलावितो परी, कोंबडी बकरी खातो ॥ १ ॥

वडील जनाचे श्राद्ध कराया गंगेमाजी पिंड देतो। खोटा व्यापार जरा ना सोडी, तो देव कसा पावतो ॥ २ ॥

खांदीपताका तुळसी गळ्यामध्ये, घडीघडी टाळ वाजवितो । गरीब जनाची दया ना चित्ती, दानासी हात आवरतो ॥ ३ ॥

झालेले मागे पाप धुवाया गंगेत धाऊनी न्हातो । तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी, कोणीच ना मुक्त होतो ॥४ ॥

 

सच काम किया जग में जिसने उसने प्रभुनाम लिया न लिया।

(तर्ज नारायण जिनके हिरदे में...)

सच काम किया जग में जिसने उसने प्रभुनाम लिया न लिया। अपने मनको बसमें हो किया, वह चारों ही धाम गया न गया।। टेक ॥।

है जिसके जबाँपर प्रेम भरा, कटुता पटुता का गर्व नहीं। हर मानव से समता जिसकी, वह मन्दर ध्यान किया न किया ॥ १ ॥

सेवा ही बना जीवन जिसका, बदला न चहे दिल से किसका । जो मस्त रहे अपने धुन में, वह गुरु का मंत्र लिया न लिया ॥ २ ॥

सब भेख बराबर है जिसको, सब संत और पंथसे प्रेम वही । जिसके भाषण में झूठ नहीं, वह ग्रंथ का पाठ किया न किया ॥ ३ ॥ यदि मौत भी आय किसी क्षण में, या संकट पर्वत प्रायः पडें । तुकड्या कहे जो डरता न उसे, तब औरों का साथ लिया न लिया ॥४॥

 

भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे ।

(चाल मम बंधु सखा शून्य...)

भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे ।

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे ।।धृ।। नांदोत सुखे गरिब अमिर एक मतानी । मग हिंदु असो ख्रिश्चन वा हो इस्लामी । स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि वसू दे । दे वरचि असा दे० ॥ १ ॥

सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना । हो सर्वस्थळी मिळूनि समुदाय प्रार्थना । उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरचि असा दे० ॥ २॥

हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी । खळ निंदका मनीहि सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे० ॥३॥

सौंदर्य रमो घर-घरात स्वर्गियापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बोहरी । तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे । दे वरचि असा दे० ॥४ ॥

 

अरे ! रिकामा कशाला फिरतं ? तुझं गावच नाही का तीर्थ ?

(चाल: कमरेला कमरपट्टा...)

अरे ! रिकामा कशाला फिरतं ? तुझं गावच नाही का तीर्थ ? ||धृ० ॥

गावी राहती गरीब उपवासी । अन्नसत्र लावितोसि काशी । हे दान नव्हे का व्यर्थ ? | तुझं० ॥ १ ॥

तुझ्या गावाची शाळा ही मोडली । धर्मशाळा तू शहरी का जोडली ? याने निघतो का जीवनात अर्थ ? | तुझं० ॥ २ ॥

गावी गरिबांची घरटी ही मोडली । तू तीर्थासि मंदिरे ही जोडली । गाव गुंड करीती अनर्थ ।। तुझं ||३ ||

आपुल्या गावाची सेवा जो करतो । तोचि कीर्तीने, मानाने तरतो । दास तुकड्या म्हणे होई सार्थ । तुझं० ॥४ ॥

 

'माणूस द्या मज, माणूस द्या'

(चाल: अवताराचे कार्य कराया...)

'माणूस द्या मज, माणूस द्या' ही भीक मागता प्रभु दिसला ॥धृ० ॥

लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणुनीया । देव म्हणे 'मज माणुस न दिसे', अजब तमाशा हा असला ॥ १ ॥

माणुस कसला हवा तुम्हाला ? सांगा तरि मी शोध करी । तव बोले प्रभु केविलवाणा, 'कुटिल नको असला तसला' ॥२॥

'जंबुक, मेंढ्या, कुतरे, डुकरे, बहुत मिळे तरि काय करु । यांना शहाणे करण्यासाठी, मला हवा माणूस भला' || ३ ||

'हृदयाचा जो सरळ असे अणि ज्यावर सगळे लोभ करी । नम्र सदा सेवेला तत्पर, मोह न ज्या अपुला कसला ॥४॥

'सकल लोक हे अपुले म्हणुनी, सर्वाकरिता प्रेम करी' । तुकड्यादास म्हणे प्रभु मागे असेल कोणी द्या त्याला ॥५॥

 

या झोपडीत माझ्या.......

(चाल वाढो सदा यशाला हा हिंद देश..)

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ||धृ० ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भुमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे । प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥ २ ॥

स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे । माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

महालापुढे शिपायी, शस्त्री दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

सुसज्ज राही । जाता तया महाला, 'मत जाव' शब्द आला । भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले । ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ||६ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या दारास नाहि दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥ ७ ॥

महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ॥ ८ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा । कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या || ९ ||

चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा । येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।। १० ।।

पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे । शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ।। ११ ।।

वाडे, महाल, राने, केले अनंत ज्याने । तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या॥। १२ ।।

'तुकड्या' मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी । मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ।। १३ ।